Akurdi : आकुर्डीतील युवकांनी साजरा केला आगळावेगळा फ्रेंडशिप डे

एमपीसी न्यूज –   ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो.
शुभेच्छा पत्रे, भेटवस्तू आणि फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी आजच्या युवा पिढीमध्ये या दिवसाचे खास आकर्षण असते . परंतु या रुळलेल्या प्रथांना फाटा देत अस्तित्व मंचाच्या माध्यमातून आकुर्डी येथील युवक मित्र -मैत्रिणींनी एकत्र येत भोसरी येथील “स्नेहवन” संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  मुलांबरोबर मैत्रदिनाची सांयकाळ व्यतीत केली.

भोसरी येथील ‘स्नेहवन-आशेचा किरण’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त व आथिर्कदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या एकूण 30 मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षण व संगोपनाचे कार्य करत आहे. अशा निस्वार्थ कार्याला पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्नेहवन मधील छोट्या दोस्तांबरोबर आनंद साजरा करण्याकरिता अस्तित्व मंचच्या युवकांनी भोसरी येथे जाऊन मुलांबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळून त्यांना भेटवस्तू व मैत्रीचा धागा फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री दिवस साजरा केला.

यावेळी संस्थाचालक अशोक देशमाने यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच जमलेल्या युवकांच्या सहभागातून संस्थेस काही रुपयांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी अस्तित्व मंच चे शंकर शिवभक्तन, मोहसीन गडकरी, मधू पाटील, शरद मगर,  सुरज बनसोडे, शिवकुमार गुप्ता, महेश साकोरे, अमित गोंदकर,अरुणा सिलम, चेतन गौतम बेंद्रे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.