Akurdi : रविवारी आकुर्डीत साकोसाचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विशेष पुरस्कार

174

एमपीसी न्यूज – साकोसा वासियांकडून इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती साकोसाचे सुनील जाधव यांनी दिली.

HB_POST_INPOST_R_A

आकुर्डी येथील खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, शिवसेनेचे शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांना सातारा भूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांना सांगली भूषण पुरस्कार, पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकचे सचिव व्ही. एस. काळभोर यांना जीवन गौरव पुरस्कार, होमिॉपेथिक डॉ. शैलेश देशपांडे यांना समाजभूषण पुरस्कार, जीएसटीचे उपायुक्त रमेश फडतरे, लालासाहेब शिंदे, पुणे ग्रामीणच्या सहआयुक्त वैशाली जाधव-माने, हिंदुराव कलंत्रे यांना विशेष कार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: