Tesla In India : एलन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात, बेंगळुरूमध्ये झाले रजिस्ट्रेशन  

एमपीसी न्यूज – ईलेक्ट्रॉनिक कारच्या विश्वात जगप्रसिद्ध असलेल्या एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने आयटी हब असलेल्या बेंगळुरूमध्ये टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडया नावाने रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. मागील काही महिन्यात टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन काही दिवसांपूर्वी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला 2021 च्या सुरुवातीला भारतात पदार्पण करेल असं म्हटलं होतं. कंपनी भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेणार आहे.

टेस्ला ‘मॉडेल 3’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल 3 ही सेडान प्रकारातली कार असून ती 0 ते 100 किमीप्रतितास इतका वेग केवळ 3.1 सेकंदात गाठू शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा अधिक आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी टेस्लाचं कर्नाटक मध्ये स्वागत केलं असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.