Alandi news : आळंदी हद्दवाढ बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद हद्दवाढ प्रस्ताव करणेबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश कड यांनी शासनास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील केळगांव,सोळू,धानोरे,मरकळ, गोलेगांव, चऱ्होली खुर्द व आळंदी ग्रामीण अशा आठ गावांचा सामावेश करणेबाबत विनंती केली आहे.(Alandi news) त्या अनुषंगाने वस्तुस्थिती अहवालासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

आळंदी नगरपालिका पत्र क्र.1129 अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे मा.प्रशासक नगरपरिषद ठराव क्र.27 (दि.7/9/2022 ) हद्दवाढ ठराव मंजूर संदर्भात दि.13/9/2022 रोजीच्या पत्राद्वारे प्रस्ताव सादर केला आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार समाविष्ट गावांची लोकसंख्या सोळू (2883),धानोरे (2567),केळगाव(3491) चऱ्होली खुर्द( 3734),आळंदी ग्रामीण(3763),मरकळ(6378),पिंपळगाव(1002),गोलेगांव(1751) अशी एकूण लोकसंख्या 25569 त्यामध्ये आहे.तसेच आळंदीतील 2011च्या जनगनेनुसार एकूण लोकसंख्या 28645 इतकी आहे.

illegal Plotting : वाकी खुर्द मध्ये बेकायदा प्लॉटिंगला चाप

तसेच यामध्ये अनुसूची अ मध्ये महसुली गावांची नांवे व गावांचा गट नंबर असणारी माहिती या सूची मध्ये आहे. अनुसूची ब आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये समावेशा नंतर निर्माण होणाऱ्या एकात्मिक भौगोलिक सीमांचा उल्लेख असणारी माहिती या सुचीमध्ये आहे. (Alandi news) क सूची मध्ये आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये सर्व महसुली गांवाचा पाणीपुरवठा,सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व इतर स्वरूपाची माहिती त्या मध्ये आहे. याबाबत ची माहिती आळंदी नगरपरिषद नगर अभियंता संजय गिरमे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.