Alandi: आळंदीत गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती कुरेकर व ह भ प डॉ नारायण जाधव यांचा जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज -ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती कुरेकर यांना जीवन गौरव व ह भ प डॉ नारायण जाधव (Alandi)यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय   आळंदी देवाची यांच्या वतीने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन  दि. 2 रोजी करण्यात आले होते.
या निमित्ताने आळंदीत गुरुवर्य शांतीब्रह्म मारोती महाराज कुरेकर व हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांची भव्य दिंडी मिरवणूक आळंदी ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाच्या वतीने काढण्यात आली.
यावेळी वारकरी संप्रदायातील हजारो लहान मुले मिरवणुकीत सहभागी झाली होती. खांद्यावर पताका, हातात टाळ, मृदुंग विणा, डोईववर तुळशी वृंदावन होते तसेच मुखी ज्ञानोबा तुकारामा जयघोष करत होती.तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील मुलांनी श्री कृष्ण व वारकरी वेशातील विविध  वेश भूषेचे वस्त्र परिधान केले होते.
पवित्र इंद्रायणी नदी तीरावर ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती कुरेकर  व ह भ प डॉ नारायण जाधव यांना आळंदी ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायातील  बहुमूल्य कार्याबद्दल तसेच त्यांना ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थ अस्मिता पुरस्कार देऊन व मानपत्र देऊनसन्मानित करण्यात आले.
यावेळी गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर म्हणाले हा भव्यदिव्य  सोहळा आळंदीकरांनी केला आहे.आळंदीकरांनी आम्हाला आपलस म्हणलं.याचे सारखे आम्हाला त्रैलोक्यात धाकत  नाही आहे.मधूकरी देऊन त्यांनी पोषण केले आहे.तसेच शेजारी आजूबाजूच्या गावचे सुध्दा आमच्यावर अनंत उपकार आहेत.तसेच ह भ प डॉ नारायण महाराज जाधव  यांनी ह भ प गुरुवर्य मारोती बाबा यांच्या बाबत मनोगत व्यक्त केले व  पुरस्काराबाबत मनोगत व्यक्त केले.
तसेच या जाहीर नागरी सत्काराची सांगता पसायदानाने झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.