Alandi: आळंदी मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

एमपीसी न्यूज -दि. 18 फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता (Alandi)पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अशी दोन केंद्र ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या ठिकाणी होती.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये एकूण 234 विद्यार्थी समाविष्ट झाले होते. पैकी मराठी माध्यमाचे 172 व इंग्रजी माध्यमाचे 62 विद्यार्थी समाविष्ट झाले होते व 100% विद्यार्थी उपस्थित होते .

Uttar Pradesh : स्वसंरक्षणासाठी 60 वर्षीय महिलेने दिली टाईम बॉम्बची ऑर्डर

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी यामध्ये 261 विद्यार्थी पैकी मराठी माध्यम 202 विद्यार्थी व इंग्रजी माध्यमाचे 59 विद्यार्थी समाविष्ट झाले होते पैकी 241 विद्यार्थी परीक्षेत उपस्थित होते म्हणजे 92.33% उपस्थिती होती दोन्ही केंद्रावरती अतिशय उत्तम रीतीने कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा पार पडल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्री शिवले सर हे केंद्रप्रमुख म्हणून तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी साठी विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांनी केंद्र संचालक म्हणून उत्तम प्रकारे कार्य पार पाडले सदर केंद्रावरील विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.