Alandi : आळंदीत साडेतीन लाख भाविकांचा कार्तिकी एकादशीला जयघोष

आळंदीत लाखो भाविकांच्या साक्षीने कार्तिकी एकादशी साजरी

एमपीसी न्युज – आळंदी कार्तिकी एकादशी श्रींचे संजीवन समाधी सोहळ्या अंतर्गत सोमवारी ( दि. 3 ) सुमारे तीन लाख भाविकांचे हजेरीत झालेल्या हरिनाम गजरात साजरी झाली. लाखो भाविकांनी नामगजर करीत वारीची सेवा रुजू केली. माउलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा बुधवारी ( दि.5) आळंदीत साजरा होत आहे. पंचक्रोशीसह यात्रेस आलेल्या वारक-यांची गर्दी होती. आळंदीत हरिनाम गजरात वारकरी दंग होते. 

या पूजेस पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त आर.के पदमनाभन,उपायुक्त स्मार्तना पाटील आयुक्त मकरंद रानडे,प्रमुख विश्वस्त विकास ढगेपाटील,विश्वस्त अजित कुलकर्णी,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले,यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर.व्यवस्थापक माउली वीर,श्रीधर सरनाईक,मालक बाळासाहेब आरफळकर तसेच आळंदी नगरपरिषदेचे आजी माजी नगराध्याक्षा,नगरसेवक,पदाधिकारी भाविक निमंत्रित उपस्थित होते.यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य राहुल जोशी यांचेसह ११ ब्रह्मवृदांनी केली.श्रींचे प्रथम वारकरी भाविक कुटुंबी म्हणून शिरापूर ता पाथ्रडी जिल्हा नगर येथील शेतकरी तुकाराम बुधवंत व कौसल्या बुधवंत यांना मिळाला.सुमारे सात तास प्रतिक्षे नंतर पाहत पूजे दरम्यान प्रथम दर्शनाचा मन त्यांनी मिळाला. आम्हालादेवाने माऊलींचे कृपेने सर्वकाही मिळालेय.दुष्कळ परिस्थिती आहे.मात्र मुले सुशिक्षित व मिळवती असल्याने काळजी करण्याचे कारण नाही.आम्हाला भरभरून मिळाले आहे.श्रींचे दर्शनाने जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे.

पहाट पवमान पूजेसाठी श्रींचे दर्शनास भाविकांची रांग रविवारी रात्री साडे अकराचे सुमारास बंद करण्यात आली होती. दरम्यान परंपरेने श्रींचे मंदिर व गाभारा सेवकांनी स्वच्छ केला. रात्री घंटानाद झाल्यानंतर समाधीला पवमान अभिषेख व पूजा वेदमंत्रजयघोषात बांधण्यात आली. अकरा ब्रह्मवृदांच्या वेदमंत्रजयघोषात पूजा झाली. परंपरेने पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरात वेदमंत्रघोषात रुद्राभिषेक झाला. श्रींचे संजीवन समाधीवर वैभवी चांदीचा मुखवटा ठेवत पंचामृत अभिषेखात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे अत्तर अर्पण करीत श्रींची वैभवी पहाट पूजा झाली.पूजेत आकर्षक वस्त्र,अलंकार,दागिने,पुष्पसजावट करीत पूजा झाली.विद्युत रोषणाई व रंगावलीने पूजेत वैभव वाढले.

अलंकापुरीत राहुट्यातून अभंग,भजन,कीर्तन, प्रवचन सुरु होते.कीर्तनकारांचे कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.दर्शनबारी पूर्ण गर्दीने भरल्याने रांग भक्ती सोपान पुलावरून नदी घाटावरील पुढे तात्पुरत्या विकसित दर्शनबारी पुढे वाय जंक्शन पासून मागे वळविण्यात आली.भाविकांच्या मंदिरात महापूजा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे भाविकांची दर्शनास गर्दी जास्त भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न झाला.श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात निघाली. संत नामदेवराय यांचे पादुका पालखीतून नगरप्रदक्षिणा उत्साहात झाली. प्रदक्षिणे दरम्यान श्रींचे पालखीचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. ग्रामप्रदक्षिणा करीत श्रींची पालखी हरिनाम गजरात मंदिरात आली. पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत भाविकांची गर्दी होती. दिंड्याची प्रदक्षिणा आळंदीत उत्साहात झाल्या.फुगड्यां,अभंग,गवळणीची कार्यक्रम झाले.द्वादशी दिनी श्रींचा रथ मिरवणूक मंगळवारी गोपाळपुरातून निघणार आहे.
पहाट पूजेस महाद्वारातून निमंत्रितांना मंदिरात सोडताना पोलीस प्रशासनाने चेहरे पाहून सोडले.पास ओळखपत्र असताना काहींना गैरसोयीस सामोरे जावे लागल्याने अनेक स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.महाद्वारात पोलिसांनी नाहक त्रास देत निमंत्रितांना प्रवेश देताना वाद घातला.अनेक पासचे प्रकार असल्याचे पोलिसांचे लक्षांत आले नाही.यातून वाद वाढला.हनुमान दरवाजेने व्हीव्हीआयपी यांना प्रवेश देण्याचे नियोजन होते.हरिहरेंद्र मठाकडूनचे पस धारकांना देखील महाद्वारातून लवकर सोडले.पास व प्रवेश तसेच पंख मंडपातील मानक-यांना व पदाधिकाऱयांना बसण्या वरून देखील पोलीस प्रशासन व देवस्थानचे पदाधिकारी यांना रोषास सामोरे जावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.