Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा 79.54 टक्के तर वाणिज्य शाखेचा 96.22 टक्के निकाल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (Alandi) यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (12 वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील कला शाखेचा 79.54% तर वाणिज्य शाखेचा 96.22% निकाल लागला.

कला शाखेत एकूण 89 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये 70 विद्यार्थी पात्र झाले. यात गीता जनार्दन चिमकुरे हिने  526/600 (87.67%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. हर्षदा ज्ञानेश्वर घुंडरे हिने 500/600 (83.33%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर ज्ञानेश्वरी केशव उबाळे हिने 486/600 (81.00%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच वाणिज्य शाखेत एकूण 107 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

Pune : विद्यार्थ्यांनी प्रदर्शातून केला चमत्कारिक तंत्रज्ञानाचा उलगडा

त्यामध्ये 102 विद्यार्थी पात्र झाले. यात सांगळे लक्ष्मण सुभाष या विद्यार्थ्याने 519/600 (86.50%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. राम सुभाष सांगळे याने – 516/600 (86.00%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर टुपके ज्ञानेश्वरी मच्छिंद्र हिने – 503/600 (83.83%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापक (Alandi) वृंदाचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सर्व संस्थेच्या वतीने व विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे व उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.