Alandi : बालविवाह प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बालविवाह प्रकरणी तरुणावर व एका महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Alandi ) आला आहे हा प्रकार तीन मे रोजी आळंदी येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात घडला.
 याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गणेश दत्तात्रय जाधव (वय 20 , रा.सातारा) व महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : भूमकर चौकातील एकेरी वाहतूकीमुळे स्थानिकांना मनस्ताप; तात्काळ उपाययोजना करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने त्याच्या शाळेच्या दाखल्याच्या व आधार कार्डच्या झेरॉक्स वर जन्म तारखेची खडाखोड करून स्वतःचे वय जास्त असल्याचे दाखवून हिंदू पद्धतीने आळंदी येथे महिलेशी विवाह केला मात्र मुलाचे वय कमी असल्याचे लक्षात येताच महिलेच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली .आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत (Alandi ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.