Alandi : सिद्धबेट परिसरामधील पालिकेच्या स्वच्छता मोहिमेतून स्वच्छ शहर, सुंदर शहराचा संदेश

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेटामध्ये 2 फेब्रुवारी (Alandi) रोजी ‘माझी वसुंधरा 3.0’ व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पालिकेचे सर्व आधिकारी, कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.

यावेळी सिद्धबेटा प्रवेशद्वारा जवळील पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. व तो सर्व कचरा गोळा करून कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकण्यात आला. येथील परिसरात स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. पालिकेमार्फत येथून स्वच्छ शहर, सुंदर शहराचा संदेश देण्यात आला.

Mahalunge : नोकरीच्या देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाकडून अत्याचार, मर्डर करण्याची धमकी

माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून आळंदी शहरात पालिकेचे कर्मचारी वर्ग विविध दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकांना ई-कचरा विलगिकरणाबाबत मार्गदर्शन करत आहेत.

तसेच व्यापारी भागातील आस्थपना /विक्री केंद्र यांना (Alandi) भेट देऊन प्लास्टिक बंदी नियमावली व त्याला पर्यायी कापडी, कागदी पर्यावरण पिशवी वापराबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत. नागरिकांना 3 आर प्रिंसिपल्सबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून कचरा विलगिकरण, साठवणूकीची योग्य पद्धत, कचऱ्याचा पुनः वापर, कचरा निर्मिती कमी व्हावी याबाबत कर्मचारी वर्ग माहिती देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.