Alandi : पुणे-आळंदी रस्त्यावरील वीजेच्या खांबास चारचाकी वाहनाची धडक

एमपीसी न्यूज :  आळंदी येथील पुणे-आळंदी (Alandi) रस्त्यावर एक चारचाकी वाहनाची रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मेन विद्युत प्रवाहाच्या लोखंडी पोलला धडक झाली आणि गाडीच्या वरील बाजूने पेट घेतला. स्थानिक नागरिकासह पोलिसांनी आळंदी अग्निशमन दलास तात्काळ पाचारण केले.

अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी त्वरित आग विझवली. यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. याबाबत माहिती अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी दिली.

Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, जगाला वेठीस धरणारं हे युद्ध थांबणार तरी कधी?

तसेच, दिघी पोलीस, विद्युत कर्मचारी घटनास्थळी त्वरित (Alandi) दाखल होऊन आग विझवण्यास सहकार्य केले. याबाबत माहिती सचिन गिलबिले यांनी दिली. चारचाकी वाहन मेन विद्युत प्रवाहाच्या पोलला धडकल्याने तेथील मेन विद्युत प्रवाह पोल दुरवस्थेत असून विजेच्या तारा तेथे जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.