गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Alandi : इंद्रायणी सेवा फाऊंडेशन वर्धापन दिनानिमित्त दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये इंद्रायणी सेवा फाउंडेशनचा (Alandi) चतुर्थ वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे उपस्थिती व कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देऊन आमंत्रित करण्यात आले.

यावेळी इंद्रायणी सेवा फाऊंडेशन अध्यक्ष विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी नेते डी डी भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, संतोष भोसले हे उपस्थित होते. इंद्रायणी सेवा फाऊंडेशन चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त शहरामधील नामवंत सेवाधारी, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व क्रीडापटूंना त्यांच्या योगदानाबाबत सन्मानित करण्यात येत आहे.

Pune News : गणेश जयंतीनिमित्त उद्या पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

तसेच, या खेडमधील आमदार निवासामध्ये (मुळगाव मोघा जि. लातूर) सध्या चाकण येथे राहत असलेले आपला उदरनिर्वाह शेंगदाणे फुटाणे विक्री करून करणारे राम सुर्यवंशी हे आपल्या 4 वर्षाच्या कन्येस तेजस्विनी सुर्यवंशी हिस घेऊन उपस्थित होते. यावेळी तेजस्वीनी सूर्यवंशीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना तिने अति तत्परपणे उत्तरे दिली.

याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह उपस्थितीतांनी तिचे (Alandi) कौतुक केले. 100 प्रश्नांना ही चिमुकली तत्परपणे उत्तर देते. तिला आता पर्यंत 4 ट्रॉफी भेटल्या आहेत. राम सूर्यवंशी यांनी तिच्याबद्दल ही माहिती दिली.

Latest news
Related news