Alandi : आळंदी मध्ये अतिक्रमणा विरोधात कारवाईला सुरवात

एमपीसी न्यूज -आज आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या (Alandi) अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधात कारवाईला सुरवात झाली .

रस्त्यावरील,फुटपाथवरील दुकाने, टपऱ्या यांची झालेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. तर काही फुटपाथवर व रस्त्यावर असलेले फ्लेक्स, दुकानाचे फलक,फुटपाथ वरील इतर वस्तू पालिका कर्मचाऱ्यांद्वारे उचलून टॅक्टरमध्ये  ठेवण्यात आले.

मंदिर परिसरा जवळील काही भाग,हजेरी मारुती चौक,भैरवनाथ चौक ते वारकरी शिक्षण संस्था चाकण चौक,नदीपलीकडील दर्शन बारी जवळील परिसर,इंद्रायणी नदी लगत इंद्रायणी नगर रस्ता फुटपाथ वरील दुकाने ,टपऱ्या ,फ्लेक्स इ.वर कारवाई करण्यात आली आहे.नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिक्रमणे काढण्या करिता पूर्वसूचना ही देण्यात आल्या होत्या.

PCMC : जलतरण तलावाच्या तिकीट दरात वाढ; आता इतके पैसे मोजावे लागणार

काही नागरिकांनी स्वतः हून रस्त्यावरील व फुटपाथवरील अतिक्रमणे काढलेली दिसून येत होती.काही त्यावेळी अतिक्रमणे काढताना दिसून येत होते. पुढील काही दिवसांमध्ये शहरात पालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी वेळोवेळी अशीच कारवाई करण्यात येणार आहे.

यावेळी पालिकेचे आधिकारी सचिन गायकवाड,अरुण घुंडरे ,पालिका कर्मचारी,पिंपरी चिंचवड स्पेशल फोर्स,पोलीस आधिकारी, कर्मचारी उपस्थित (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.