Alandi : पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर विक्रेते बसल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयात (Alandi ) आज पालिका प्रशासक तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली भाजी मंडई संदर्भात बैठक आयोजित केली होती. यामध्ये पोलीस व वाहतूक विभाग आधिकारी,आळंदी ग्रामीण रुग्णालय आधिकारी, रिपब्लिकन सेना, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ ग्रुप समस्त ग्रामस्थ व भाजी मंडई विक्रेते, टपरी पाथरी हातगाडी पंचायतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये संयुक्तपणे बैठक झाली.

रिपब्लिकन सेना, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी व सिद्धार्थ ग्रुपचे पदाधिकारी संदीप रंधवे, रवींद्र रंधवे, विश्वजीत थोरात यांच्या वतीने इनाम वर्ग 6 ब (महार वतन) सर्व्हे नंबर 1,2,3 क्षेत्रावर आळंदी नगरपरिषदेने अनाधिकृत केलेले अतिक्रमण बाबत प्रश्न उपस्थित केले. संबंधित जागेचा मोबदला देण्यात यावा. भाजी मंडई स्थलांतरीत करावी. किंवा योग्य त्या टक्केवारीत संबधीत जागेत (जमीन मालकांना) आम्हाला तिथे गाळे देण्यात यावे. पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बसू नये, यावेळी त्यांनी येथे सांगितले.

आळंदी पालिकेचे जे गाळेधारक भाडेकरू आहेत, त्यांना नाममात्र भाडे असून ते पोटभाडेकरू ठेवत आहेत. पोटभाडेकरू ठेवून वीस हजार रुपये ते घेत आहेत. काही भाजी विक्रेत्यांचे भाजी मंडईमध्ये गाळे असून त्यांनी तिथे ही पोट भाडेकरू ठेवले आहेत. ते त्यांच्याकडून भाडे घेत आहेत. असे विषय ही उपस्थित वर्गांकडून या बैठकीत सांगण्यात आले.

आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी आठवड्यात ग्रामीण रुग्णालयात किती रुग्ण येतात? तसेच रुग्णांबरोबर जे नातेवाईक असतात त्यांची आकडेवारी यावेळी सांगितली. रुग्णवाहिकेतून गर्भवती महिला प्रसूतीच्या वेळी येथे आणल्या जातात यासाठी येथील रस्ता का? अतिक्रमण मुक्त असावा याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस आधिकारी शहाजी पवार यावेळी म्हणाले, रस्त्यावर दुतर्फा गाड्या पार्किंग हाऊ नये म्हणून प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेवर सुसज्ज इमारती बांधून पार्किंगची व्यवस्था करावी. रस्त्यावरील दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असते. तेथील गाडी उचलण्यासाठी व (Alandi) ती वाहने ठेवण्यासाठी टोइंग व्हॅनची व्यवस्था करावी.

रस्त्यावरील अतिक्रमण मुक्ततेसाठी अतिक्रमण विभागातील व्यक्ती सदैव तत्पर रहावा, पालिकेतील अतिक्रमण विभागातील व्यक्तीच कारवाईसाठी हजर नसतात. शेतकरी भाजी विक्रेते वर्गासाठीसुद्धा जागेची व्यवस्था करावी. ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर भाजी मंडई बसते यावर या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, डी डी भोसले पाटील यावेळी म्हणाले.

पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय हा परिसर अतिक्रमण मुक्त असेल. बाकी विरोध नाही. विरोध असेल तर आम्ही मोडून काढू. तेथे बसणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी. टीडीआरच्या मोबदल्यात काही जागा मालक जागा देण्यासाठी तयार आहेत.

पाथरी हातगाडी पंचायतीच्या वतीने भगवान वैराट, बाबा कांबळे, बळीराम काकडे, मल्हार काळे व इतर पदाधिकारी यांनी भाजी मंडईसाठी आरक्षित असलेली जागा भाजी विक्रेत्यांना मिळावी किंवा जागा आरक्षित कराव्यात. ती भाजी मंडई सुसज्ज असावी त्यामध्ये विविध सुविधा असाव्यात. आषाढी कार्तिकी दरम्यान भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर होते. त्यासाठी योग्य त्या प्रशासनाकडून उपाययोजना व्हाव्यात.

आंदोलनकर्त्या जमीन मालकांचेही प्रश्न सोडवावेत. पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालय परिसरात जो भाजी विक्रेता इतर व विक्रेता बसेल त्यावर कारवाई करावी. प्रकाश कुऱ्हाडे यावेळी म्हणाले, आंदोलनकर्त्यांना मोबदला मिळावा. पालिकेने पूर्वी काही आरक्षण असलेल्या जागा ताब्यात घेतल्या व काही न घेतल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, येथील जागा आरक्षित व्हावी. पालिकेच्या नवीन इमारतीचे नियोजन आहे.

माजी नगराध्यक्षा वैजंयता उमरेगेकर यांनी ही भाजी मंडई व अतिक्रमणाबाबत आपले मत व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, आंदोलनकर्त्या जमीन मालकांना मोबदला मिळावा. प्रशासनाने सहकार्य करावे. समीर गोरे यांनी ही भाजी मंडई संबंधित विषयावर माहिती दिली.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यावेळी म्हणाले, पालिकेत नवीन रुजू झालो आहे. तरी या बैठकीच्या माध्यमातून अनेक महत्वाचे विषय कळाले. जिल्हाधिकारी यांच्याकडे आंदोलनकर्त्या जमीन मालकांच्या मागण्यांचा पालिकेमार्फत( संबंधित) चर्चा विषय ठेवू.

प्रशासकीय पातळीवर जेवढे शक्य प्रयत्न करणे, शक्य आहे ते करू. भाजी मंडईच्या पालिकेकडे वारंवार तक्रारी येत होत्या. काही मोजक्या माणसांमार्फतच आडकाठी केली जाते. तिथे बसण्याचा हट्ट केला जातो. ठोस निर्णयासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. त्या संबधित निर्णय झाला असता.

शाळेकडे गेल्यास पावसाळ्यात परत समस्या उद्भवणार परत स्थलांतर होणार. त्यासाठी कायमस्वरूपी मंडई जागा आरक्षित करणे महत्त्वाचा मुद्दा आहे. आरक्षण खासगी व्यक्तींच्या जमिनीवर आहे. जागेविषयी त्यांच्या संकल्पना महत्वाच्या आहेत.
आरक्षित जागेसाठी निधी, सोई सुविधा ही महत्वाच्या असतात. त्या शासनाकडून मिळवाव्या लागतात.

भविष्य काळात निवडणूकीनंतर प्रशासन व प्रतिनिधी यांच्या समन्वयाने हा निर्णय घ्यावा लागेल. डीपीनुसार दोन ते तीन ठिकाणी भाजी मंडईची व्यवस्था करावी लागेल. याची मानसिकता आता पासूनच ठेवावी. तहसीलदार वाघमारे मॅडम यावेळी म्हणाल्या प्रश्न तुम्हीच उपस्थित केले उत्तर ही तुम्हीच दिले.

आळंदीकरांकडे जागृकता आहे. तर हा वादाचा मुद्दा निघाला नाही पाहिजे. भाजी मंडईसाठी दीर्घकालीन सुविधा करावी लागेल. जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलनकर्त्या जमीन मालकांचा विषय मांडून प्रशासनाकडून शक्य ती त्यांना मदत मिळेल. हा न्यायालयीन लढा आहे. प्रशासनाकडून त्यांना सहकार्य लाभेल. भाजी मंडई संदर्भात एका व्यक्तीसाठी प्रशासनास वेठीस धरत असाल तर ते कदापी चालू देणार नाही. त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालयावरील रस्त्यावर कोणीही विक्रेता बसणार नाही. यावेळी या बैठकीत निर्णय झाला.
यावेळी माजी नगरसेवक सचिन गिलबिले, प्रियेश सोनवणे, रामदास दाभाडे, राहुल कुऱ्हाडे, महेश जाधव, बाळू जाधव, जनार्दन भिसे, गणेश काळे व पालिका आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.