Alandi : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग; पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अंघोळ करताना महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. हा प्रकार महिलेने पतीला सांगितला असता पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे घडली. याप्रकरणी आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल भगवान बलखंडे (वय 28, माझगाव चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन आठवड्यांपूर्वी फिर्यादी महिला चोहोबाजूंनी साडी बांधून तयार केलेल्या न्हाणीमध्ये आंघोळ करत होती. त्यावेळी आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर आरोपीने महिलेला एका ठिकाणी बोलावून तिचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवले. त्याआधारे आरोपीने तिच्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली.

प्रेमसंबंध न ठेवल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. हा धक्का सहन न झाल्याने पीडित महिला आणि तिच्या पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जोंधळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.