Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील वाहतुक बदल

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा बुधवार (दि. 5) रोजी होणार आहे. त्यानिमित्त राज्यभरातून भाविक भक्त आळंदीला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही मार्गावर वाहतूक रोखण्यात आली आहे. रोखण्यात आलेल्या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ही वाहतूक व्यवस्था गुरुवार (दि. 29) ते गुरुवार (दि. 6) या कालावधीत असणार आहे. सर्वसाधारण वाहनांना रोखण्यात आले असून दिंड्यांबरोबर येणारी आणि अत्यावश्यक सेवा पुरविणा-या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते आणि पर्यायी मार्ग :

पुणे-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग : पुणे – दिघी मॅगझीन चौक – मोशी – चाकण

मोशी-देहूफाटा रस्ता
पर्यायी मार्ग : मोशी – चाकण – शिक्रापूर
मोशी – भोसरी – मॅगझीन चौक – दिघी

हवालदार वस्ती मोशी
पर्यायी मार्ग : मोशी – हवालदार वस्ती – भोसरी

चाकण-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग : चाकण – मोशी – मॅगझीन चौक – दिघी – पुणे (पुण्याकडे जाण्यासाठी)
चाकण – पिंपळगाव फाटा – मरकळ – लोणीकंद (सोलापूर महामार्गाकडे जाण्यासाठी)

वडगाव-घेनंद-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग : वडगाव – घेनंद – पिंपळगाव फाटा – चाकण – नाशिक महामार्ग रोडने पुण्याकडे

मरकळ-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग : मरकळ – सोळू – धानोरे – च-होली खुर्द (पीसीएस कंपनी फाटा) – बायपास रोडने च-होली बुद्रुक – पुणे

चिंबळी-आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग : चिंबळी – मोशी – भोसरी – मॅगझीन चौक – दिघी – पुणे

आपत्कालीन मार्ग
श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी – चाकण चौक – इंद्रायणी हॉस्पिटल आळंदी – चाकण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.