Alandi : कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज : श्री क्षेत्र आळंदी येथे 8 जून रोजी गाथा परिवारातर्फे (Alandi) आयोजित कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी श्रवणीय हरी कीर्तनाचा लाभ घेतला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील, गाथा परिवाराचे संस्थापक ह.भ.प उल्हास पाटील, माजी आमदार राम कांडगे, प्रा.अर्जुन कोकाटे यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच, त्या पत्रकारांशी बोलताना इंद्रायणी जलप्रदूषणाबाबत म्हणाल्या, की इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी अजित पवार यांनी आराखडा, योजना आखल्या होत्या. परंतु, सरकार बदलले.अजित पवार पालकमंत्री होते, तेव्हा जिल्ह्याचे नियोजनबद्ध काम चालत, ते उत्तम पालकमंत्री होते.

कोल्हापूर घटना, महाराष्ट्र नोकर भरती, औद्योगिक पट्ट्यात खंडणी प्रकार चालू आहेत. याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केली.
तसेच, त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराला सदिच्छा भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.

Keral : देवभूमीत पावसाचे आगमन; अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.