Alandi: जया एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

एमपीसी न्यूज -दि.20 रोजी आळंदी  येथे जया एकादशी (Alandi)निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.एकादशी निमित्त माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्या मध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

 

भाविकांसाठी मंदिरात उपवासाच्या( पदार्थाचे )महाप्रसादाचे आयोजन (Alandi)करण्यात आले होते.यावेळी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. इंद्रायणी घाटावरती श्रद्धापूर्वक पवित्र इंद्रायणी मातेची पूजा करताना भाविक दिसून येत होते.तसेच मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता.

Pimpri : शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प, 2911 कोटींचा खर्च

तसेच आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेत आज दि.20 व उद्या 21रोजी  दोनदिवसीय महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय 58 व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील विविध भागातून या वार्षिक अधिवेशनाला अनेक नागरिकांनी, मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.