Alandi : मोकळ्या जागेत बोलावून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणाला फोन करून मोकळ्या जागेत बोलून घेत  त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी पाचच्या सुमारास खेड तालुक्यात चिंबळी येथे घडली.

किशोर कल्याण आनंदे (वय 18, रा. चिंबळी, ता. खेड),  असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी  आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन काळे (रा. मंत्रा मॅजिक सोसायटी, चिंबळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी किशोर यांना फोन करून चिंबळी येथील समीर जहिद यांच्या प्लॉटिंग पाडलेल्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले. किशोर प्लॉटिंगमध्ये गेले असता आरोपीने त्यांना मारहाण केली. यामध्ये किशोर यांच्या डोक्यात, हाताला, खांद्यावर तसेच पोटाला गंभीर दुखापत झाली.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.