Alandi : भागीरथी नाला जवळील स्वच्छतागृह बंद अवस्थेत

एमपीसी न्यूज : प्रस्थान सोहळ्यास अवघे 4 दिवस बाकी आहेत. (Alandi) परंतु भागीरथी नाला येथील दोन्ही बाजूस असलेली स्वच्छता गृहे बंद अवस्थेत आहेत. तसेच पोस्ट ऑफिस जवळील एका गल्लीत पालिकेचे स्वच्छता गृह असून ते दुरुस्ती अभावी बंद असल्याचा फलक तेथे लावण्यात आला आहे.

पालखी सोहळ्या निमित्त लाखो भाविक आळंदीत दाखल होतात. त्यांच्यासाठी प्रशासना मार्फत मोबाइल शौचालयाची सुविधा केली जाते. परंतु भागीरथी नाला येथील व इतर दुरुस्ती अभावी बंद असे फलक लावून ठेवलेली स्वच्छतागृह भाविकांसाठी का खुली नाही? दुरुस्ती अभावी बंद असेल तर वारी आधी का दुरुस्ती केली गेली नाही? दुरुस्ती झाली असेल तर बंद का आहे? असे प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

भागीरथी नाला येथील स्वच्छतागृह माऊली (Alandi) मंदिरापासून जवळ आहे. तसेच पोस्ट ऑफिस जवळील स्वच्छता गृह प्रदक्षिणा रस्त्याजवळ आहे. ही स्वच्छता गृहे वारकरी भाविकांसाठी खुली झाली तर त्याच्या सुविधा भाविकांना वारी काळात घेता येतील.

Bjp : रेडझोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल – बाळा भेगडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.