Alandi : आळंदी, चिखली, हिंजवडी मधून तीन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी चिखली हिंजवडी परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मारुती रामभाऊ मिडगुले (वय 40, रा. बाभूळगाव, ता. शिरूर, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी पहाटे मारुती यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीचे एम एच 12 / जे जे 7568 खेड तालुक्यातील कोयाळी येथे लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

लक्ष्मण गुणेसिंग राजपुरोहित (वय 38, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते त्यांच्या मूळ गावी राजस्थान येथे गेले. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी सी एकूण 6979 ही दुचाकी माय चॉइस फॅमिली, कोयनानगर कॉर्नर, चिखली येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

शुभम बाबासाहेब भोसले (वय 23, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. शुभम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुभम यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 10 / बी डी 1148 ही दुचाकी कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील बावधन येथील कोठारी टोयोटा शोरूम समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्याची दुचाकी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.