Alandi : दुचाकीस्वाराला टोळक्याकडून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीस्वाराला कट मारून त्याला टोळक्याने कोयत्याने मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू येथे घडली.

सुशांत सुनील कांबळे (वय 20, रा. सोळू, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याने याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील मोळक, अनिकेत किसान ठाकूर, स्वागत नंदकुमार गोडसे, नागेश गुलचंद सूर्यवंशी, आदेश भानुदास पाटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशांत शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / एच एस 2325) घरी जात होते. मरकळ रोडने जात असताना मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यामध्ये सुशांत खाली पडले. त्यानंतर कारमधून आलेल्या पाच आरोपींनी मिळून सुशांत यांना मारहाण केली. नंदकुमार याने कोयत्याने सुशांत यांच्या तोंडावर मारहाण केली. यामध्ये सुशांत जखमी झाले. आरोपींनी सुशांत यांना ‘तुला लय माज आलाय का’ असे म्हणत धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.