Alandi : 500 तुळशी रोपांचे वाटप करून साजरे करण्यात आले वाढदिवस

एमपीसी न्यूज- आरोग्यवर्धक ,सुख शांती (Alandi ) प्रदायक ,प्रदूषणनाशक अशी तुळशी ची ओळख आहे.तसेच हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

 

10 th Result : विद्येच्या माहेर घराला मागे टाकत 100 टक्के गुण मिळवण्यात लातूर पॅटर्न ठरला सरस 

याचे महत्त्व लक्षात घेऊन माजी नगरसेवक  प्रशांत  कुऱ्हाडे पाटील व जनसेवक गोविंदा कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जय गणेश ग्रुप ,जय गणेश प्रतिष्ठान, चेतन नाना कुऱ्हाडे कृष्णाहंडी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून 500 तुळशींच्या रोपांचे वाटप नागरिकांना करण्यात आले.याबाबत माहिती गोविंदा कुऱ्हाडे यांनी (Alandi ) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.