Alandi: उर्जा प्रकाशालयच्या दोन्ही अंध विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Alandi: blind students of Urja Prakashalaya have achieved great success in the matriculation examination आळंदी येथील उर्जा प्रकाशालय या संस्थेचे दोन अंध विद्यार्थी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसले होते.

एमपीसी न्यूज – उर्जा प्रकाशालयच्या दोन्ही अंध विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. दोघांनाही प्रथम श्रेणीत गुण मिळाले आहेत.

रोशन संजय सकट आणि दीप प्रमोद देशमुख अशी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. रोशनला 69 टक्के गुण मिळाले तर दीपला 75 टक्के गुण मिळाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

बुधवारी (दि. 29) दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला निकाल ऑनलाइन माध्यमातून पाहिला.

आळंदी येथील उर्जा प्रकाशालय या संस्थेचे दोन अंध विद्यार्थी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसले होते. उर्जा प्रकाशालायाच्या अनेक अडचणींना मागे सारून दोघांनी भरपूर अभ्यास करून चांगले गुण मिळवले आहेत, असे उर्जा प्रकाशालयचे पंकज कुलकर्णी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1