Alandi : किचनची खिडकी उचकटून घरातील टीव्ही लंपास

एमपीसी न्यूज- बाहेरगावी गेले असता बंद घरच्या खिडकीतून हात घालून चोरट्याने टीव्ही लंपास केला. गुरुवारी (दि. 18) सकाळी आळंदी येथे ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी विकास बापूसाहेब काळे (वय 40, रा.काळे कॉलनी, आळंदी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळे हे बुधवारी रात्री सहकुटुंब सासुरवाडीला एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या किचनची खिडकी उचकटली. खिडकीतून हात घालून 15 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. पोलीस उपनिरक्षक आर.एस.कांबळे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.