Alandi : चंद्रशेखर बावनकुळे यांची राम गावडे यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Alandi ) यांनी ( दि.25 ) काल भाजप नेते राम गावडे यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचा हार,शाल,श्रीफळ ,विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला. 
राम गावडे यांचा ज्यावेळी  शिवसेनेतून भाजप मध्ये प्रवेश झाला. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे  यांनी त्यांना सांगितले,  तुमच्या निवास्थानी अवश्य सदिच्छा भेट देईन, तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेईन.

 माझ्या भाजप प्रवेशावेळी  शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला व अजूनही दररोज भाजपमध्ये  इन कमिंग चालू आहे, असे राम गावडे यावेळी म्हणाले.

 

 यावेळी राम गावडे यांचे सर्व कुटुंबीय ,भाजप पदाधिकारी पांडुरंग ठाकुर, किरण येळवंडे, आकाश जोशी ,अमोल वीरकर,संदीप पगडे,सतीश गुंड,राहुल घोलप,संकेत वाघमारे,संगीता फपाळ,मंगल हुंडारे व मान्यवर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित (Alandi ) होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.