Alandi : चाकण-आळंदी मार्गावरील वाहतुकीत बदल!; 10 फेब्रुवारीपर्यंत असणार हा बदल

एमपीसी न्यूज – चाकण-आळंदी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल मंगळवार (दि. ४) ते सोमवार (दि. 10) या कालावधीत असणार आहे. याबाबतचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आदेश दिले आहेत.

आळंदीजवळ केळगाव चौकात वारकरी शिक्षण संस्थेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 10 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या दरम्यान महोत्सवासाठी अति महत्वाच्या व्यक्ती येणार आहेत.

तसेच नागरिकांची देखील गर्दी होत आहे. त्यामुळे चाकणकडून आळंदी शहरात येणा-या जड वाहनांना आळंदी फाटा नाशिकरोड येथून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनांनी मोशीमार्गे आळंदीकडे वळून इच्छित स्थळी जावे.

हा बदल तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. 4 ते 10 फेब्रुवारी या कालावधी सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत हा बदल असेल. यातून अग्निशमन विभाग, पोलीस आणि रुग्णवाहिका या वाहनांना वगळण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like