Alandi News : चऱ्होली खुर्द हद्दीतील आळंदी चऱ्होली रस्त्याची पावसामुळे बिकट अवस्था

एमपीसी न्यूज – चऱ्होली खुर्द येथे आळंदी – चऱ्होली रस्त्याची पावसामुळे फारच बिकट अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून चिखलाचा राडारोडा असल्याने दुचाकी चालकांना वाहन चालवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

तर पादचाऱ्यांना खड्डा व चिखल यातून चालण्यासाठी वाट शोधावी लागत आहे.या रस्त्यावरून चऱ्होलीतून आळंदीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तसेच आळंदीतील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची  संख्या जास्त प्रमाणात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.