Alandi : माऊली मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज :  आळंदी मध्ये गुरुवारी 30 मार्चला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात युगप्रवर्तक ,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशात असणारी अस्सल दुर्मिळ चित्राच्या प्रदर्शनाचे आयोजन केले. (Alandi) सागरमाथा,मऱ्हाठा पातशाह,श्री शिवस्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठाण,गड किल्ले सेवा संस्था,दगडाच्या देशा यांनी रामनवमीचे औचित्य साधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना होणाऱ्या शिंदेशाही उटीच्या निमित्ताने केले.

Pune : वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार : किरीट सोमय्या 

फ्रान्स ,बर्लिन जर्मनी,नेदरलँड,लंडन,मुबंई इ.ठिकाणची त्यांची ही मूळचित्रे असून त्यांच्या अस्सल दुर्मिळ चित्राचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले. (Alandi) व त्यांची माहितीचे फलक चित्राखाली लावण्यात आले आहेत. तसेच त्या काळी  वापरण्यात येणारी  काही शस्त्रे ही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.आज (दि.30)रात्री 9 पर्यँत हे दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन  खुले असणार आहे.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.