Alandi : सामायिक बांधावर जनावरे चारण्यावरून दोन गटात वाद

एमपीसी न्यूज – सामायिक बांधावर जनावरे चारण्यावरून दोन गटात वाद झाला. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी चारच्या सुमारास कोयाळी येथे घडली. याप्रकारणो परस्पर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आनंदा राघु आल्हाट (वय 58, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार रामदास सखाराम कोळेकर, नवनाथ रामदास कोळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • आनंदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रामदास आणि नवनाथ यांनी आनंदा यांच्या शेतात गाय आणि म्हैस चारण्यासाठी आणली. आनंदा यांनी दोघांना जनावरे शेतात आणू नका, असे सांगितले. त्यावरून आरोपींनी त्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून बघून घेण्याची धमकी दिली.

याच्या परस्परविरोधात 21 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार आनंदा रघु आल्हाट, पांडुरंग राघू आल्हाट, मनीषा पांडुरंग आल्हाट, कोमल मंगेश आल्हाट, अक्षय पांडुरंग आल्हाट, पूजा राजाराम आल्हाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्या सामायिक बांधावर त्यांची गाय आणि म्हैस चारण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावरून आनंदा याने महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेची जाऊ भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ केली. त्यात त्यांचे मंगळसूत्र पडून गहाळ झाले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.