Alandi: जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी

एमपीसी न्यूज –   जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही (Alandi)घटना शनिवारी (दि. 13) दुपारी आंबेडकर चौक, चिंबळी येथे घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

58 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार बाळू मासळकर, वैभव मासळकर(Alandi) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपींनी संगनमत करून जागेच्या कारणावरून शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून येत त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी आणि त्यांचा मुलगा घरात पळून गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Pune: नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे – मुरलीधर मोहोळ 

याच्या परस्पर विरोधात 50 वर्षीय महिलेने फिर्यादी दिली असून श्रीकांत सातव आणि सचिन सातव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या जमिनीवरील 1200 चौरस फूट जागेच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. फिर्यादी यांच्या पतीला दगडाने आणि लाकडी फळीने मारले. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना शिवीगाळ दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.