Alandi : गीता भक्ती महोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी स्वच्छता

एमपीसी न्यूज  – आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ( Alandi ) गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हजारो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले असून रस्त्यावर धूळ साचून त्यांचे आरोग्य (सर्दी,घशाचे त्रास होऊन) बिघडू नये यासाठी पालिकेकडून ठीक ठिकाणी प्रमुख रस्त्याची, बाह्य वळण रस्त्याची स्वच्छता मशीनद्वारे करण्यात आली आहे.

 

Today’s Horoscope 11 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

गेल्या काही दिवसांपासून आळंदी इंद्रायणी घाट व शहरातील परिसर, रस्ते वारंवार  स्वच्छ करताना पालिकेचे कर्मचारी दिसून येत आहे. गीता भक्ती अमृत महोत्सवामुळे इंद्रायणी घाट आकर्षकरित्या   विविध  रोपांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. पालिकेमार्फत दुतर्फा इंद्रायणी घाट पूर्णपणे स्वच्छ केल्याने  घाटावर हजारो वारकरी भाविकांच्या  बैठक व्यवस्थेची सुविधा झाली ( Alandi ) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.