Alandi : इंद्रायणी नदीतील जलपर्णी चार दिवसांत काढण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Alandi) प्रस्थान सोहळ्याला 11 जून रोजी प्रारंभ होत आहे. अवघे काही दिवसच पालखी प्रस्थान सोहळ्याला राहिले आहेत. यासाठी चाकण रोड पुलाजवळील बंधाऱ्यातील जलपर्णी काढण्याचे कार्य पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सुरू आहे.

सोहळ्याच्या काही दिवस आधीच अनेक वारकरी आळंदीमध्ये येतात तसेच इंद्रायणी नदीमध्ये ते दररोज स्नान करत असतात. त्यामुळे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी पालखी प्रस्थान सोहळ्या अगोदरच निघावी. वारकऱ्यांसाठी तेथील इंद्रायणी नदीपात्र जलपर्णी मुक्त व्हावे.  यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत 31 मे रोजी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढणी कामाची पाहणी केली.

Alandi : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने हे काम (Alandi) पुढील 4 दिवसात पूर्ण करून घेण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी निर्देश दिल्याची माहिती  मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.