Alandi : अविरत श्रमदान आणि गडकिल्ले सेवा संस्थेकडून कोटी तीर्थावर श्रमदान

एमपीसी न्यूज : आज अविरत श्रमदान आणि गडकिल्ले सेवा संस्थेने (Alandi) नगर परिषदेच्या परवानगीने कोटी तीर्थावर श्रमदान सुरू केले. अत्यंत दयनीय अवस्थेत आणि पुर्णतः दुर्लक्षित असलेल्या या कुंडाची आणि परिसराची स्वच्छता करताना संस्थांचे सर्व सदस्य अथक मेहनत घेतली. 

गेली शेकडो वर्षे हे कुंड विजनवासात गेले होते. तीर्थक्षेत्र आळंदी येथील रहिवासी आणि इतिहास अभ्यासक असलेले  नाजिम शेख यांनी आळंदीतील 54 कुंडांपैकी 22 कुंडांचा शोध घेण्यात यश मिळवले.

कुंडाच्या बाजूने वाढलेले गवत, काटेरी झुडपे काढून टाकण्यात आली. यावेळी कुंडातील दलदल, चिखल, गाळ बादलीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आले. यावेळी मोहन कदम यांनी प्रत्यक्ष गाळात उतरून साफसफाई केली. यावेळी जीवंत मासा तसेच ऑक्सीजन नसलेल्या ठिकाणी जीवंत कासव सापडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच या कुंडाची हार, फुले आणि श्रीफळ वाढवून पूजा केली.

Pune : ‘दगडूशेठ’च्या संगीत महोत्सवात दिग्गजांचे सादरीकरण अनुभवण्याची पर्वणी

 

कुंडाचा इतिहास –  Alandi

 

थोर शैवमुनी आणि दत्त संप्रदायाचे उर्ध्वयु श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी आळंदी पंचक्रोशित सन 1876 ते 1878 या कालावधीमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये तपश्चर्येच्या आणि साधनेच्या जोरावर इंद्रायणी तीरावर गंगा आणि कृष्णा नदीचे पाणी प्रकट केले. ज्या ठिकाणी ते पाणी प्रकट झाले त्याठिकाणी त्यांनी कुंड बांधले याच कुंडाला कोटीतीर्थ म्हणून संबोधले.

केवळ या कोटी तीर्थामुळे भयंकर दुष्काळातही जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. या कोटीतीर्थ कुंडातील पाणी एवढे प्रभावी आहे, की या पाण्याने काही दिवस नियमित अंघोळ केली वा त्या पाण्याने शरीर स्वच्छ केले असता सर्व चर्मरोगांपासून सुटका होते व रुग्ण पूर्ण बरा होतो. अशी महती संप्रदायिक ग्रंथात उपलब्ध असल्याचे बोलले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.