Alandi Crime : वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या मुलाला भावाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – वडिलांना भेटण्यासाठी भावाच्या घरी गेलेल्या मुलाला त्याच्या भावाने गजाने बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता च-होली खुर्द, घोलप वस्ती येथे घडली. भरत ज्ञानेश्वर घोलप (वय 40, रा. च-होली खुर्द, काकडे सिटी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर ज्ञानेश्वर घोलप (रा. च-होली खुर्द, घोलप वस्ती, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत यांचे वडील त्यांच्या जुन्या घरी भरत यांचा भाऊ समीर याच्यासोबत राहतात. शनिवारी सकाळी भरत त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी जुन्या घरी गेले. घराच्या ओट्यावर असताना आरोपी घराच्या बाहेर आला. त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी भरत आणि त्यांचे वडील आरोपी समीर याला समजावून सांगत होते. मात्र आरोपीने ‘तू माझ्या घरी यायचे नाही’ असे म्हणत भरत यांना हाताने व गजाने मारहाण केली. ‘तू व तुझी बायको, मुले इथे आली तर त्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.