Alandi : अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु (Alandi)असलेल्या अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी मरकळ येथे करण्यात आली.

चरणसिंग प्रभातसिंग रजपूत (रा. मरकळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dehugaon : देहूतील उपोषणकर्त्यांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी( Alandi)रजपूत याने बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन एकत्र करून त्याची भट्टी लावली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 25 हजार रुपये किमतीचे 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.