Alandi Crime : मुलाला घरातून हाकलून देण्यासाठी भांडण करत पतीने पत्नीचा हात, मुलीचा पाय मोडला

एमपीसी न्यूज – तुम्हाला घरात राहू देणार नाही असे म्हणत पतीने आपल्या पत्नीसह दोन मुली व मुलाला गंभीर मारहाण केली. यामध्ये पत्नीचा हात, एका मुलीचा पाय मोडला आहे तर, दुसरी मुलगी व मुलाला दुखापत झाली आहे. खेड तालुक्यातील खिरपाडवस्ती कोयाळी येथे सोमवारी (दि.30) हि घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी भरत केरू दिघे ( वय 50, रा. कोयाळी, ता खेड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पत्नी उज्ज्वला भरत दिघे ( वय 45, रा. कोयाळी, ता खेड ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलाला तू घरात रहायचे नाही म्हणून त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या दोन मुली पुढे आल्या मात्र, आरोपीने फिर्यादी व मुलीला दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात मोडला तर, एका मुलीचा डावा पाय मोडला. तसेच, मुलगा व दुस-या मुलीला दुखापत झाली असून मुका मार लागला आहे. आरोपीने सर्वांना शीवीगाळ करून तुम्हाला घरात राहु देणार नाही असे सांगितले. पुन्हा माझ्याकडे आलात तर, मारून टाकीन अशी धमकी दिली. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.