Alandi crime News : शेतात गवत कापण्यासाठी निघालेल्या महिलेचे अपहरण करून बलात्कार; एकाला अटक

एमपीसी न्यूज – शेतात गवत कापण्यासाठी जात असलेल्या महिलेचे कारमधून अपहरण केले. तिला धुळे येथे नेऊन तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बाबुराव नामदेव कोळपे (वय 30, रा. कोयाळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 376 (2) (एन), 377, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 26) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता शेतामध्ये गवत कापण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून धुळे, शिरपूर येथे नेले. तिथे महिलेच्या इच्छेविरोधात तिच्यावर बलात्कार केला.

फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.