Alandi crime News: अंगावर कार घालून श्वानाला ठार मारल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नेहमीच्या रस्त्याने न जाता मोकळ्या जागेतून जात अंगणात झोपलेल्या श्वानाच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी साडेआठ वाजता खेड तालुक्यातील कोयाळी गावात घडली.

ज्ञानेश्वर प्रकाश रहाटे (वय 23, रा. कोयाळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महादेव जवंत टेंगले (वय 40, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेंगले यांचा श्वान त्यांच्या घरापासून २५ फूट अंतरावर मोकळ्या जागेत झोपला होता. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर याने त्याची कार रस्त्याने न नेता जाणीवपूर्वक मोकळ्या जागेतून आणली. फिर्यादी यांचा श्वान मोकळ्या जागेत झोपला असताना त्यांच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.