_MPC_DIR_MPU_III

Alandi crime News : सरकारी जमीन मोजणीत अडथळा आणणाऱ्या चौघांवर गुन्हा; एकाला अटक

मोजणीचे काम सुरु असताना आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी भुकरमापक कुणाल यांना धक्काबुक्की केली.

एमपीसी न्यूज – अतितातडीची सरकारी मोजणी करत असताना जमिनीच्या मूळ मालकांनी भूकरमापक यांना धक्काबुक्की करून जमिनीची मोजणी करण्यासाठी अडथळा निर्माण केला. याबाबत चौघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

ही घटना शुक्रवारी (दि. 28) दुपारी बारा वाजता खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे चाकण येथे घडली.

भुकरमापक कुणाल पुरुषोत्तम भगत (वय 26) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शंकर भगवान टिंगरे, दत्तात्रय भगवान टिंगरे आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शंकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील गट नंबर 48 या जमिनीची अतितातडीची मोजणी करण्यासाठी शासकीय सेवक म्हणून राजगुरुनगर येथील खेड भूमी अभिलेख कार्यालयाचे भुकरमापक कुणाल भगत उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी आरोपी शंकर, दत्तात्रय आणि त्यांचे थिटे वकील देखील मोजणीसाठी उपस्थित होते.

मोजणीचे काम सुरु असताना आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी भुकरमापक कुणाल यांना धक्काबुक्की केली.

‘तुम्ही आमच्या जमिनीची कोणाच्या आदेशानुसार मोजणी करण्यासाठी आले आहेत, तुम्ही मोजणी करायची नाही’ असे म्हणून आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.