Alandi Crime News : अवैधरित्या दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा; एक लाखाची दारू जप्त

एमपीसी न्यूज – मरकळ येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. यात एक लाख सात हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26) दुपारी केली.

अमोल जयसिंग काची (वय 27), स्वाती संजय काची (वय 33, दोघे रा. बागवान वस्ती, मरकळ, ता. खेड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी मरकळ येथील हॉटेल नानाश्री (मच्छी स्पेशल) व्हेज नॉनव्हेज या हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारु व बियरची विक्री करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली.

त्यात पोलिसांनी पाच हजार 390 रुपये रोख रक्कम, एक लाख सात हजार 635 रुपयांची देशी, विदेशी दारू असा एकूण एक लाख 13 हजार 25 रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुळे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.