Alandi crime News : अल्पवयीन मुलावर मित्राकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मित्राला दुचाकीवरून घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) रात्री सव्वासात वाजता वडगाव घेनंद घाटातील मंगल कार्यालयाजवळ घडला आहे.

व्यंकटेश उर्फ बापू रावसाहेब रणसिंग (रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलाला आरोपीने त्याच्या दुचाकीवर बसवून वडगाव घेनंद घाटातील मंगलकार्यालयाजवळ नेले. तिथे त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

घरी आल्यानंतर मुलाने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like