Alandi Crime News : गांजा व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – अमली पदार्थ, गांजा तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याजवळून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंबिका मारुती गरुड (वय 55, रा. आळंदी, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग आळंदी परिसरात गस्त घालत असताना एक महिला अवैध गांजा व दारूची विक्री करत आल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून व दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आळंदीतील घुंडरे आळी येथे सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.

तिच्या जवळून चार लाख तीन हजार किमतीचा पंचवीस किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाख बारा हजार 900 रुपये रोख रक्कम व साडे तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस अधिक तपस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.