Alandi Crime News : डंपरला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून डंपर वळताना झालेल्या अपघातात डंपरला धडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सात जून 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजता खेड तालुक्यातील केळगाव येथे घडला. याबाबत 14 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील बबन विरकर (वय 39, रा. केळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार नितीन बनकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अविष्कार बन्सी शिरतार (वय 18, रा. च-होली खुर्द) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डंपर (एम एच 14 / एच यु 9691) घेऊन आळंदीकडून चाकणकडे घेऊन जात होता. हनुमानवाडी केळगाव येथे छत्रपती शिवाजी कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर जाण्यासाठी आरोपीने अचानक डंपर वळवला.

त्यावेळी मयत अविष्कार दुचाकीवरून चाकणकडून आळंदीकडे जात होता. डंपर अचानक वळाल्याने अविष्कार याचा दुचाकीवरील तोल सुटला. दुचाकी डंपरच्या मागील चाकाला जाऊन आदळली. या अपघातात अविष्कार हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.