Alandi Crime News: फळ वाहतुकीसाठी नेलेल्या टेम्पोसह चालक पसार; साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फळ वाहतुकीचे भाडे आल्याचे सांगून चालकाने टेम्पो नेला. साडेतीन महिने उलटले तरी चालकाने टेम्पो आणून दिला नाही. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिनिनाथ प्रेमराज ढवळे (वय 38, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुलवंत हजारा सिंग (वय 38, रा. पंजाब) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढवळे यांच्याकडे एम एच 40 / ए के 2573 हा मालवाहतूक टेम्पो होता. त्या टेम्पोवर आरोपी कुलवंत सिंग चालक म्हणून काम करत होता. 31 मे रोजी त्याने फिर्यादी यांना सांगितले की, फळ वाहतुकीचे भाडे मिळाले आहे. ते भाडे करण्यासाठी टेम्पो घेऊन जातो, असे सांगून सिंग याने टेम्पो नेला.

साडेतीन महिने उलटले तरी त्याने टेम्पो परत आणून दिला नाही. ढवळे यांनी आरोपीला वारंवार फोन करून टेम्पो आणण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपीने टेम्पो परत केला नाही. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.