Alandi crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने वकिलाच्या कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – एक मद्यपीने कारला दुचाकी आडवी लावून कार थांबवली. कार चालक वकीलाकडे दारू प्यायला पैसे मागितले. पैसे न दिल्याने कारची तोडफोड करून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजता खेड तालुक्यात कोयाळी ते भिवरेवाडी रोडवर घडली.

महेश संपत भिवरे (वय 30, रा. कोयाळी (भिवरेवाडी), ता. खेड) यांनी याबाबत सोमवारी (दि. 16) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष लहू काळे (रा. कोयाळी (धनगरवाडा), ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिवरे वकील आहेत. रविवारी रात्री ते त्यांच्या मित्रासोबत कारमधून जात होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आरोपी संतोष आला. त्याने भिवरे यांच्या कारला दुचाकी आडवी लावून कार थांबवली. त्यावेळी संतोष दारू प्यायलेल्या अवस्थेत होता.

त्याने भिवरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास भिवरे यांनी नकार दिला. त्यावरून संतोषने शिवीगाळ करत कारची काच, भंपर फोडून नुकसान केले. तसेच मारण्याची धमकी देऊन संतोष निघून गेला.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1