Alandi crime news : तीन दुकाने फोडून चोरट्यांनी पळवले ‘ब्लाउज पीस’

0

एमपीसीन्यूज – दोन अनोळखी चोरट्यांनी किराणा, मेडिकल आणि कापड दुकान फोडून दुकानांमधून रोख रक्कम आणि 46 ब्लाउज पीस चोरून नेले. ही घटना आळंदी येथे घडली.

उद्धव भागवत पांडुळे (वय 32, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 16) पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी चावडी चौकातील प्रगती ड्रेसेस हे कापडाचे दुकान, मंगलमूर्ती मेडिकल आणि कोकाटे ट्रेडिंग कंपनी हे किराणा दुकान अशा तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी केली.

चोरट्यांनी कपड्याच्या दुकानातून 1 हजार 288 रुपयांचे ब्लाउज पीस आणि 400 रुपये, किराणा दुकानातून दीड हजार रुपये, मेडिकल दुकानातून 800 रुपये असा एकूण 4 हजार 238 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.