Alandi Crime News : पत्रा शेडमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी व विदेशी दारूची विक्री करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.5) आळंदीतील इंद्रायणी नदीजवळ ही कारवाई केली.

गिरीराज चिमनलाल बैरवा (वय 32, रा. चाळीस फुटी रोड, आळंदी रोड) व मिलींद जनार्दन कांबळे (वय 42, रा. गुंडरे आळी, आळंदी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इंद्रायणी नदीकाठी, गोपाळपुरा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी व विदेशी दारू विक्रीचा व्यावसाय करत होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने याठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून देशी, विदेशी दारू, रोख रक्कम, एक मोबाईल, एक दुचाकी (एमएच 14 जेएफ 9548), असा एकूण नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चासकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.