Alandi Crime : ‘मी आळंदीचा दादा आहे’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भांडणे सोडविल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच ‘मी आळंदीच्या दादा आहे. मी आळंदीच्या लोकांकडून हप्ते गोळा करतो. मी तुम्हा गावातील लोकांना संपवून टाकतो’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. हा प्रकार चाकण चौक आळंदी येथे घडला.

मयूर रामदास घुंडरे (वय 25, रा. घुंडरे आळी, ता. खेड), शंकर घुंडरे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयूर यांनी बुधवारी (दि. 25) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादू देवकाते, स्वप्नील शेंडगे, भोसले, महेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शेतातील कामे संपवून मयूर घरी जात होते. त्यावेळी सुरज सुतार, माउली परवे, महादू देवकाते यांचे भांडण सुरु होते. मयूर यांनी त्यांची भांडणे सोडवली आणि घरी आले. त्यानंतर आरोपी महादू याने मयूर यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तू चाकण चौकात ये’ म्हणून मयूर यांना बोलावूनघेतले.

मयूर आणि त्यांचा भाऊ शंकर असे दोघेजण चाकण चौकात गेले असता आरोपींनी शिवीगाळ करत मयूर आणि त्यांचा भाऊ शंकर यांना मारहाण केली. मयूर यांना ‘मी आळंदीच्या दादा आहे. मी आळंदीच्या लोकांकडून हप्ते गोळा करतो. मी तुम्हा गावातील लोकांना संपवून टाकतो’ अशी धमकी देत दगडाने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी देत कपडे फाडून आरोपी निघून गेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.