Alandi News : आळंदी मध्ये सर्वत्र दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री दत्त मंदिरात दत्त जन्मानिमित्त सकाळी श्रीगुरुचरित्र पारायणाचे पठण करण्यात आले. तसेच या मंदिरामध्ये  सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कीर्तन आयोजित केले होते. श्री दत्त जन्मानिमित्त मंदिरा मध्ये पुष्प माळांनी श्रीं चा पाळणा सजविण्यात आला होता. (Alandi News) सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यानचा दत्त जन्म उत्सव कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांना सुंठवड्या चा प्रसाद वाटण्यात आला.मंदिरामध्ये श्री दत्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती. आळंदी ग्रामीण भागातील कुऱ्हाडे वस्ती वर श्री स्वामी मंदिरा मध्ये श्री दत्त जयंती निमित्त सकाळी( होम )धार्मिक इ. विधीचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी श्री दत्त जन्म उत्सव साजरा करून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.या मंदिरामध्ये आकर्षक फुलसजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Pimpri News : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधातील बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार

आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने सुध्दा पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते, अशी मान्यता आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे.(Alandi News) या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्वमनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.